Pimple Soudagar : कमाईचा एक घास जगाच्या पोशिंद्याला देणारं हॉटेल दुर्वांकर बुफ्फे ग्राहकांच्या भेटीला

कमाईचा एक घास जगाच्या पोशिंद्याला देणारं हॉटेल दुर्वांकर बुफ्फे ग्राहकांच्या भेटीला

एमपीसी न्यूज- जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला आपल्या कमाईचा एक घास देणारे शहरातील पहिल्या हॉटेलचे उदघाटन (रविवार दि. 16) पिंपळे सौदागर येथे होत आहे,  हॉटेल दुर्वांकर बुफ्फे.

एखाद्या हॉटेलची फ्रॅन्चायजी घेतल्यानंतर त्याची रॉयल्टी आपण कोणताही विचार न करता देतो. मग हॉटेल व्यवसायासाठी लागणार भाजीपाला, धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा त्याची रॉयल्टी द्यायला काय हरकत आहे, या भावनेने सुरु करण्यात येणारे पिंपळे सौदागर येथील हॉटेल दुर्वांकर बुफ्फेचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते रविवारी (दि. 16) संध्याकाळी करण्यात येणार आहे.

हॉटेलच्या वैशिष्ट्याबाबत हॉटेलच्या संचालिका सीमा सुनील पवार म्हणाल्या, “शेतमाल पिकविणा-या शेतक-यांसाठी कच्चा मालाचा उत्पादक घटक या नात्याने हॉटेलमधील वार्षिक उत्पनांवर पाच टक्के रॉयल्टी देण्याचा निर्णय हॉटेलने घेतला आहे. तसेच वर्षभर जमा झालेली रक्कम गरीब गरजू शेतकरी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणांसाठी दिली जाणार आहे”

हॉटेलबाबत माहिती सांगताना त्या म्हणाल्या, “अनलिमिटेड थाळीमध्ये भरपेट खा, पण अन्न वाया घालवू नका. अन्न ठेवल्यास 30 रुपये दंड द्यावा लागेल. व्हेज थाळी व नॉनव्हेज थाळीचे दर सर्वांना परवडतील असे आहेत. तसेच हॉटेलची खासियत म्हणजे नॅनो थाळी (लिमिटेड), स्पेशल थाळी (लिमिटेड), तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन कोंबो मसाला, नॉन व्हेज थाळी आदी पदार्थांची घरगुती पध्दतीची चव खवय्यांना अनुभवता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.