Pimpri : आदित्य शिरोडकरांच्या उपस्थितीत 50 जणांचा मनविसेत प्रवेश

एमपीसी न्यूज – आज पिंपरी चिंचवड शहरातील ५० जणांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेकांनी आज पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या वतीने योग्य तो सन्मान करुन प्रवेश करणा-यांना काम करण्याची संधी दिली जाईल. मनसे पक्षाने दिलेली जबाबदारी प्रत्येक जण मनांपासून पार पाडतील.

  • मनविसेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे. तरुणांचा मोठा कल पक्षात प्रवेश करण्याकडे असून पक्ष चांगल्या पध्दतीने वाटचाल करीत आहे. युवकांसाठी काम करणारी मनविसे विद्यार्थी सेना युवकांच्या गळ्यातील ताईत बनली.

यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, सचिन पवार, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे आदी उपस्थित होते. विक्रम आडे, तेजस देशपाडे ,बिपीन पाल,शुभम महाडिक,ओमकार पाचारणे,श्रीकृष्ण गंगातीर,यश काटे,आकाश आवसरे,अनिकेत वाघमारे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.