Pimpri: विधानसभा मतदार संघातील तब्बल पाच हजार मतदार वगळणार !

स्थलांतरित, दुबार, मृत मतदार वगळणार ; महासभेसमोर प्रस्ताव दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदार संघातील स्थलांतरित, दुबार, मृत मतदारांची नावे वगळणीचे काम सुरु आहे. मतदारसंघात तब्बल चार हजार 645 मतदार वगळण्यास पात्र असून त्या मतदारांना वगळण्यात येणार आहे. 206 पिंपरी विधानसभेतील मतदान केंद्रस्तरीय अधिका-याकडून मतदारांना नोटीस बजावून त्यांचे जाबजबाब, पंचनामे करुन छाननी सुरु आहे. या बाबतचा प्रस्ताव बुधवारी (19) महासभेसमोर आयत्यावेळी दाखल करून घेतला आहे.

राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या 10 मे 2018 नुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानूसार 206 पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या एकूण 399 यादी भागातील स्थलांतरित, दुबार, मृत मतदारांची नावे वगळण्याचे काम सुरु आहे. हे काम मतदान केंद्रस्तरीय अधिका-याकडून सुरु आहे. स्थलांतरित, दुबार सर्व मतदारांना नोटीस बजाविण्यात आल्या असून प्राप्त पंचनामे यांची छाननी करुन पहिल्या टप्प्यात यादीनूसार 4 हजार 645 मतदार वगळण्यास पात्र आहेत.

याबाबत त्या मतदारांच्या नावाची यादी मुख्य निवडणूक आयोग, पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी -चिंचवड महापालिका या तिन्हीही वेबसाईटवर अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे. या वगळणी कार्यक्रमाचा व्यापक प्रसिध्दीचा भाग म्हणून प्रस्तावित वगळणी करण्यात येणाऱ्या मतदारांची यादी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.