Pimpri: साठ वर्षांपुढील रेशनिंग दुकानदारांच्या घरातील सदस्यांना रेशनिंग दुकान चालविण्याची परवानगी द्या – गजानन बाबर

Allow family members of ration shopkeepers over 60 years of age to run ration shops - Gajanan Babar : खासदार बाबर यांची अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे मागणी

एमपीसी न्यूज – राज्यातील साठ वर्षावरील रेशनदुकानदारांच्या कुटुंबातील सदस्यांना दुकान चालविण्यासाठी परवानगी देण्यात यावी. काही अटीनुसार जर नियमांचे पालन करून साठ वर्षांवरील दुकानदार दुकान चालवत असेल तर त्यालाही परवानगी देण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या निवेदनात खासदार बाबर यांनी म्हटले आहे की, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी साठ वर्षाच्या पुढील रेशनिंग दुकान चालकांना दुकान चालवण्यासाठी बंदी घातली आहे.

वास्तविक पाहता कोणताही नियम करायचा झाला तो संपूर्ण राज्यासाठी करावा लागतो. परंतु, विशेषता एका जिल्ह्यासाठी एक नियम व दुसऱ्या जिल्ह्यांसाठी वेगळा नियम अशी विषमता असल्यास लोकांमध्ये तसेच रेशनिंग दुकानदारांमध्येही संभ्रम निर्माण होतो.

सध्या कोरोना साथीचा प्रादुर्भाव सर्व ठिकाणी पसरलेला आहे. काही लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. कुटुंब चालवणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत जर रेशनिंग दुकान चालकांची दुकाने जर बंद केली तर, त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार याचाही विचार करणे आवश्यक आहे.

60 वर्षावरील आरोग्यव्यवस्थापणेला अत्यावश्यक सेवा म्हणून रूग्णालयात काम करण्याची परवानगी दिली आहे. रेशनिंग दुकानदारही अत्यावश्यक सेवेत मोडला जातो. कारण अन्न धान्य पुरवणे ही सुद्धा एक अत्यावश्यकच सेवा आहे.

60 वर्षावरील दुकानदारांच्या घरातील सदस्य पूर्णपणे दुकान चालवण्यासाठी प्रशिक्षित झालेली असतात. त्यांना त्यातील सर्व माहिती असते. त्यामुळे अशाप्रकारे कारवाई करू नये. जेणेकरून रेशनिंग दुकानदारांचा उदरनिर्वाह करण्याचे साधनच राहणार नाही. सर्व कुटुंब उघड्यावर येईल याची जाणीव सरकारने ठेवावी.

साठ वर्षावरील दुकानदारांना रेशनिंग दुकान चालवण्यासाठी त्यांच्या घरातील सदस्यांना परवानगी देण्यात यावी. काही अटीनुसार जर नियमांचे पालन करून साठ वर्षावरील दुकानदार दुकान चालवत असेल. तर त्यालाही परवानगी देण्यात यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.