Shooting Of laal rang chaddha cancelled : अखेर लालसिंह चढ्ढाचे लडाख येथील शूटिंग रद्द

Finally laal rang chaddha canceled the shooting at Ladakh लडाखमधील शूटिंग आता कारगिलमध्ये होण्याची शक्यता आहे.

एमपीसी न्यूज – काही दिवसांपूर्वी लडाखच्या भारत चीनच्या सीमेवर चकमक झाली. त्यामुळे तेथील वातावरण अशांत बनले आहे. त्या पार्श्वभूमीवर अभिनेता आमिर खानने त्याच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाचे लडाख येथील चित्रीकरण रद्द केले आहे.  दिग्दर्शक अद्वैत चंदन आणि प्रॉडक्शन हाऊसशी बोलल्यानंतर आमिरने लडाखमध्ये शूट न करण्याचा निर्णय घेतला आहे. लडाखमधील शूटिंग आता कारगिलमध्ये होण्याची शक्यता आहे.

लडाखमध्ये हा सिझन फिरण्यासाठी योग्य असतो. पुढे सप्टेंबरनंतर तेथील वातावरण बदलते. त्यामुळे या कालावधीत येथे शूटिंग करणे शक्य होते. पण या तणावपूर्ण स्थितीत तेथे जाणे धोक्याचे ठरणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी आमिरच्या स्टाफ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर आमिर अधिक घाबरला आहे. त्याला कलाकार आणि क्रूसाठी कोविड -19 चा कोणताही धोका पत्करण्याची इच्छा नाही.’

‘लाल सिंह चड्ढा’ हा ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत रीमेक आहे. या चित्रपटाचे शूटिंग चंदीगडमध्ये सुरु होते पण मार्चमध्ये सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे ते थांबवावे लागले. या चित्रपटात आमिर व्यतिरिक्त करीना कपूर – खानची देखील मुख्य भूमिका आहे.

मूळ फॉरेस्ट गंप या चित्रपटात फॉरेस्टचा मेंदू कमी काम करतो. मात्र तरीही यश संपादन करतो आणि प्रसिद्ध होतो. पण त्याचे खरे प्रेम त्याला सोडून जाते. या चित्रपटाला ऑस्करमध्ये एक डझन नामांकने मिळाली होती आणि सहा पुरस्कार या चित्रपटाने पटकावले होते. टॉम हँक्सला यासाठी सलग दुस-यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट लेखक विन्स्टन ग्रूम यांच्या 1986 मध्ये आलेल्या कादंबरीवर आधारित होता. हिंदी रिमेकमध्ये आमिर टॉम  हँक्सची भूमिका साकारणार आहे.

आमिरचा अखेरचा चित्रपट 2018 मध्ये आलेला यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा होता. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.