Pimpri : वाहनांची जाळपोळ करणारा मनोरुग्ण ताब्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी परिसरात वाहनांची जाळपोळ करुन दहशत पसरवणाऱ्या मनोरुग्णाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मिलींद प्रभु पंडित (वय 25, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे मनोरुग्णाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित हा पिंपरी परिसरात कोणत्याही वस्तुचे नुकसान करत असे. शनिवारी (दि. 2) आणि रविवार (दि. 3) रोजी रात्रीच्या वेळी मंडई परिसरात दुचाकी जाळल्याची घटना घडली होती. त्याचा पोलीस तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिलींद दिसला होता. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता. त्याच्या या त्रासाला स्थानिक देखील त्रासले होते. त्याने या आधीही परिसरात मालमत्ता जाळून टाकल्या आहेत.
याबाबत स्थानिकांनी व नातेवाईकांनीही माहिती दिली. त्याच्यावर मानसिक उपचार सुरू असल्याचेही नातेवाईकांनी सांगितले आहे. त्याला ताब्यात घेत पोलिसांनी येरवडा येथील मनोरुग्णालयात त्याची रवानगी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.