Pimpri : जाहिरात फलक दिसत नसल्याने झाडांवर कुऱ्हाड! पालिकेकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

एमपीसी न्यूज – जाहिरात फलक दिसत नसल्याने (Pimpri) फांद्या छाटण्याची परवानगी घेतली असता एका कंपनीने झाडे खोडापासून कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कंपनीवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगत महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. कंपन्यांवर दंडात्मक कारवाई नको फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनसमोरील पदपथावरील फांद्या तोडण्याची परवानगी एका कंपनीला दिली होती. त्यामुळे कंपनीने फांद्या छाटणे अपेक्षित होते. पण, परवानगी फांद्या छाटण्या ऐवजी कंपनीने झाडे खोडापासून कापली आहेत. 10 ते 12 झाडे खोडापासून कापली गेली. याबाबत पर्यावरणप्रेमींनी तक्रार केल्यानंतर महापालिका दंडात्मक कारवाई करुन मोकळी झाली.

कंपन्या पैसे भरायला तयार होतात. पैसे घेवून महापालिकेने हात झटकू नये. कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. महापालिकेच्या बोटचेप्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

वृक्षप्रेमी प्रशांत राऊळ म्हणाले, फांद्या छाटण्याची परवानगी घ्यायची आणि झाड मुळासकट तोडायचे याची लोकांना सवय झाली आहे. वृक्षतोडीला दिलेली परवानगी प्रसिद्ध करण्याची कायद्यात तरतूद आहे. पण, तसे होत नाही. त्याचा लोक गैरफायदा घेत आहेत. त्याला उद्यान विभागाचे सहकार्य असते.

फाद्यांची छाटणी होताना उद्यान विभागाच्या अधिका-यांना तिथे उपस्थित असणे आवश्यक आहे. बेकायदेशीरपणे झाडांची सर्रासपणे होत आहे. याबाबत तक्रार करुनही आयुक्त, उपायुक्तांचे दुर्लक्ष होत आहे. परवानी फांद्या छाटण्याची असताना झाडे तोडणा-यांविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे.

Pimpri : विनापरवाना भारतात वास्तव्य करणाऱ्या परदेशी महिलेचा मृत्यू

उद्यान विभागाचे प्रमुख रविकिरण घोडके म्हणाले, धोकादायक (Pimpri) फांद्या छाटण्यास परवागी देण्याचा अधिकार उद्यानप्रमुखांना आहे. झाड तोडण्याचे अधिकार वृक्ष प्राधिकरण समितीला असतात. फाद्या छाटण्यास परवानगी दिली होती. परंतु, त्यांनी फांद्या मोठ्या प्रमाणात छाटल्या आहेत. परवानगी दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्याबाबत विचार करत आहोत. जास्तीत-जास्त दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

शहरात वारंवार होतेय बेकायदा वृक्षतोड

बांधकाम, जाहिरात फलकांसाठी शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. खासगी जागेसह महापालिकेची झाडेही विनापरवाना तोडली जात आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका प्रशासन या संदर्भात गांभीर्याने पावले उचलत नसल्याच्या तक्रारी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.