Bhosari : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Bhosari ) करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना चक्रपाणी वसाहत भोसरी येथे सोमवारी (दि. 21) घडली.

सूर्यकांत इंचुरे (वय 31, रा. मधुबन सोसायटी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने मंगळवारी (दि. 22) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : जाहिरात फलक दिसत नसल्याने झाडांवर कुऱ्हाड! पालिकेकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इंचुरे याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास कशाचे तरी आम्ही दाखवून स्वतःच्या घरी नेले. सायंकाळी (Bhosari) साडेपाच वाजेपर्यंत त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.