Pimpri : चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत चार जणांनी मिळून दोघांना मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 26) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिंपरी येथे घडली.

समीर मुनीर शेख (वय 20, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मझहर मिराज शेख (वय 21), अशपाक तांबोळी (वय 20), विशाल उर्फ विशल्या (वय 24), आनंद शिंगाडे (वय 23, रा. खराळवाडी, पिंपरी) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर आणि त्यांचा मित्र अलिराजा वली शेख (वय 18) हे दोघेजण पिंपरी येथे थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपींनी चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत लाकडी बांबूने समीर यांच्या हातावर, तसेच अलिराजा यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून जखमी केले. याबाबात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.