Pimpri: मी इथला भाई आहे म्हणत तरुणाला बेदम मारहाण 

एमपीसी न्यूज –  मी इथला भाई आहे. जेल भोगून आलो आहे. असे म्हणत एकाने (Pimpri)आपल्या पाच ते सहा साथीदारांसोबत मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना २६ मार्च रोजी आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी येथे घडली.
गौतम उर्फ दाद्या दीपक कदम (वय २३, रा. आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी) आणि त्याच्या (Pimpri)पाच ते सहा साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सलीम रहिमान शेख (वय ३०, रा. आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune: पुणे लोकसभा निवडणुकीला आता येणार रंगत; वसंत मोरे यांच्या उमेदवारीचा मोहोळ आणि धंगेकर यांना धसका 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम शेख हे २६ मार्च रोजी रात्री त्यांच्या घराच्या बाहेर लघुशंकेसाठी गेले होते. तिथे आरोपी बसले होते. त्यांना शेख यांनी विचारणा केली. त्यावरून आरोपींनी शेख यांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून शिवीगाळ केली.
गौतम कदम याने ‘मी इथला भाई आहे. जेल भोगून आलो आहे. मला तुला संपवायला वेळ लागणार नाही’ अशी धमकी दिली. पोलिसांनी गौतम कदम याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.