Pimpri: आवास योजनेत सफाई कर्मचा-यांना सवलत देण्याची मागणी

Concession to cleaning workers

एमपीसी न्यूज – राज्यातील व पिंपरी-चिंचवड शहरातील साफसफाई कामगारांना पंतप्रधान आवास घरकुल योजनेत शंभर टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. 

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, साफसफाई करुन शहरांची स्वच्छता करण्यात या कामगारांचा मोठा वाटा आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील साफसफाई कामगारांना महापालिकेमध्ये समाविष्ट करुन घेण्यात यावे.

कंत्राटी पद्धीने काम करणा-या कामगारांना ठेकेदाराकडून किमान वेतन कायद्यानुसार वेतन व अन्य कुठलीही सेवा दिली जात नसून त्यांची पिळवणूक केली जात आहे. आयुष्यभर सफाई काम करणा-या कामगारांना पेन्शन व इतर शासकीय सुविधा मिळवून द्याव्यात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.