Pimpri corona Update : शहरात शुक्रवारी कोरोनाचे 160 नवीन रुग्ण; 292 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (शुक्रवारी, दि. 11) 160 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 292 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 94 हजार 88 एवढी झाली आहे. तर आजवर 90 हजार 765 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी पिंपरी चिंचवड शहरातील 5 तर शहराच्या बाहेरील 5 रुग्णांचा मृत्यू झाला.

मृत्यू झालेले शहरातील रुग्ण किवळे (62 वर्ष), चिखली (85 वर्ष), (63 वर्ष), नेहरूनगर (84 वर्ष), चिंचवड (75 वर्ष) येथील आहेत. शहराच्या बाहेरील रुग्ण येरवडा (47 वर्ष), सिंहगड रोड (55 वर्ष), रावडीवाडी (70 वर्ष) येथील आहेत.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 716 तर शहराच्या बाहेरील 693 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 803 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 804 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 78 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 851 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.