Pimpri Corona Update : रविवारी शहरात 41 नवीन रुग्ण; 63 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 24) दिवसभरात 41 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 63 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 75 हजार 778 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 71 हजार 344 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 483 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 682 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 255 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 427 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 17 हजार 19 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 22 लाख 41 हजार 408 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.