Pimpri Corona Update : शहरात आज 520 नवीन रुग्णांची नोंद, 175 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 520 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 175 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 19 आणि महापालिका हद्दीबाहेरील 12 अशा 31 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 49 हजार 276 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 5 हजार 222 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 2 हजार 243 रुग्ण गृहविलगीकरणात असून 2 हजार 979 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 183 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 1 हजार 119 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 373 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 4 लाख 89 हजार 556 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.