Pimpri corona Update : कोरोनाचा उद्रेक! शहरात आज 1442 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1431 आणि महापालिका हद्दीबाहेरील 11 अशा 1442 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 219 आणि ‘ब’ कार्यालय हद्दीत 218 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 623 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील सात आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन अशा नऊ जणांचा आज मृत्यू झाला आहे.

त्यात दापोडीतील 60 वर्षीय पुरुष, आकुर्डीतील 35 वर्षाचा युवक, चिंचवड येथील 65, 50 वर्षाच्या दोन महिला, पिंपरीतील 70, 66 वर्षाच्या दोन महिला, लोहगाव येथील 89 वर्षीय वृद्ध महिला, मुळशीतील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 20 हजार 949 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 8 हजार 766 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1904 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 800 अशा 2724 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1716 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1524 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 91 हजार 424 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 5869 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.