Pimpri corona Update : शहरात आज 132 नवीन रुग्णांची नोंद, 39 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 120 आणि महापालिका हद्दीबाहेरील 12 अशा 132 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 39 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

पुनावळे येथील 80 वर्षीय वृद्धाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात आजपर्यंत 1 लाख 1618 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 97 हजार 940 जण बरे होऊन घरी गेले. शहरातील 1827 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 769 अशा 2596 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 677 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर 914 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 1 हजार 2942 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 740 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.