Pimpri Corona Update : शहरात आज 226 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज, 204 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 204 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 226 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 3 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 309 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 60 हजार 869 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 294 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 243 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 51 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 55 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 443 आहेत. आज दिवसभरात 5 हजार 687 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 7 लाख 89 हजार 267 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.