Pimpri Corona Update : रुग्णसंख्या घटली ! शहरात आज 1109 नवे रुग्ण, 1758 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. शहराच्या विविध भागातील 1 हजार 109 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1 हजार 758 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 46 आणि महापालिका हद्दीबाहेरील 31 अशा 77 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 3 हजार 562 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 39 हजार 861 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 20 हजार 613 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 14 हजार 853 रुग्ण गृहविलगीकरणात असून 5 हजार 760 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 360 आणि माक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या 2 हजार 171 वर गेली आहे. आजपर्यंत 4 लाख 60 हजार 180 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.