Pimpri : राम मंदिर राष्ट्रार्पण दिनी शासकीय सुट्टी जाहीर करा;   आमदार महेश लांडगे यांची मागणी

एमपीसी न्यूज – प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर राष्ट्रार्पण व श्रींची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी होत आहे. हा दिवस भारतीयांसाठी गौरवाचा आणि उत्सवाचा (Pimpri ) आहे. महाराष्ट्रामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान  प्रभू श्रीराम यांचे जन्मभूमी अयोध्या येथे मंदिरात आगमन व प्राणप्रतिष्ठा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होत असून, हा भारतीयांसाठी मोठा आनंदोत्सव व ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. नागरिकांची जनभावना लक्षात घेऊन राज्य शासनाने 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि हा दिवस सण-उत्सवाचा दिवस म्हणून घोषित करावा.

Pimpri : शहरी रस्त्यांचे नियोजन, पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता वाढविण्यात पिंपरी-चिंचवड अग्रेसर

हिंदू धर्म…संस्कृती आणि अखंड भारताच्या अस्मितेचे प्रतिक प्रभू श्रीराम मंदिरासाठी 500 वर्षांपासून भारतीयांना प्रतिक्षा करावी लागली. पिढ्यांन-पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरले आहे. अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर सकाराले जात आहे. मंदिर निर्माणसाठी अनेकांची मोठा संघर्ष केला होता, त्या संघर्षाचे फळ दिसत आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून हिंदू धर्म, संस्कृतीचा पुरस्कार करणारे प्रखर हिंदुत्ववादी सरकार काम करीत आहे.  प्रभू श्रीराम यांना आराध्य दैवत मानणारे अनेक मंत्री सत्तेत आहेत. यातील अनेक नेत्यांनी कारसेवा देखील केली आहे. त्यामुळे प्रभू श्रीराम जर पुन्हा आपल्या जन्मस्थानी विराजमान होणार असतील, तर त्या गोष्टीचा जल्लोष झालाच  (Pimpri ) पाहिजे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.