Pimpri : पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवयाला मिळणार पंचमदांच्या गाण्यांची मैफल

एमपीसी न्यूज- आर.डी. बर्मन म्हटले की ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ सारख्या रोमॅण्टिक गाण्यापासून यम्मा…यम्मा या अशा आयटम साँगपर्यंत सारीच गाणी अशी नजरे समोरून जातात, अन आपण नकळत दिवसभर ती गुणगुणत राहतो. अशा आपल्या गितांनी अजरामर झालेल्या पंचम दा यांच्या गाण्यांच्या मैफीलीचा पिंपरी-चिंचवडकरांना मेलेडियस आर.डी या कार्क्रमातून 20 जानेवारी रोजी घेता येणार आहे. प्रशांत साळवी यांचे आलाप एन्टरटेन्मेंट व आराध्य एन्टरटेन्मेंट हे संयुक्त रित्या या कार्यक्रमाचे आयोजन करणार असून एमपीसी न्यूज हे याचे मीडिया पार्टनर असणार आहेत.

आर.डी. बर्मन यांची गाण्याची मैफल 20 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता चिंचवड येथील एल्प्रो सिटी स्क्वेअर येथे रंगणार आहे. या कार्यक्रमात पंचम दा यांनी कंपोज केलेल्या गाण्यांचा वर्षाव प्रेक्षकांवर होणार आहे. हि गाणी तितक्याच ताकतीने संदिप उबाळे, जितेंद्र भुरुक, प्रशांत साळवी, गायत्री धारेश्वर, राजेश्वरी पवार,रेश्मी मुखर्जी हे सादर करणार आहेत. यावेळी संगीत दिग्दर्शक अविनाश चंद्रचुड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Pimpri : स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवडची भरारी, शहराचा देशात 13 तर राज्यात 3 क्रमांक

तसेच ऑरकेस्ट्रामध्ये मिहीर भाडकमकर, प्रसाद गोंडकर, सुरेश अय्यर, सुशील शिरसाठ, उमेश वळसे, सचिन वाघमारे, लीजेश एस., सुनिल सवाई, अजय अत्रे, केदार मोरे, नितीन शिंदे हे असणार आहेत तर सुत्रसंचालन डॉ.अमित त्रिभुवन हे करणार आहेत.

अशा गाण्यांच्या मेजवानी पिंपरी-चिंचवड मध्ये वारंवार होत नाहीत.त्यामुळे वाट कसली बघताय असा आगळा वेगळा थोडासा हटके हा गाण्याचा कार्यक्रम आपण चुकवू नका. यासाठी इच्छुकांना 9922420829/ 9607603535/ 7558798689 वर संपर्क करा व आपली सीट निश्चित करा.

याशिवाय ऑनलाईन बुकिंग ही बुक माय शो वर https://in.bookmyshow.com/events/melodious-rd/ET00381902 देखील करता येणार आहे. मग नक्की या अन गाण्यांचा आस्वद घ्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.