Pimpri : महिला पोलिसांसाठी फिरत्या स्वच्छतागृहाची मागणी

एमपीसी न्यूज – बंदोबस्तावर असलेल्या महिला (Pimpri) पोलिसांसाठी स्वच्छतागृहाची सोय नसते. त्यामुळे महिला पोलिसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यासाठी बंदोबस्तावरील महिला पोलिसांसाठी फिरत्या स्वच्छतागृहाची व सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीनची सोय करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पुराणिक यांनी केली आहे.

पुराणिक यांनी मुख्यमंत्री कार्यालय तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, कोणताही सणवार, राजकीय, सामाजिक कार्यक्रम व सार्वजनिक उत्सव असेल तर महिला पोलीस बारा तास रस्त्यावर कर्तव्य बजावतात. परंतु त्यांना स्वच्छतागृहाच्या सुविधा पुरविल्या जात नाहीत.

CBSE Fake Account’s on X : सोशल मीडियावर सीबीएसईची 30 बनावट खाती

अशावेळी महिला पोलिसांना आसपासच्या एखाद्या घरामध्ये स्वच्छतागृहाबाबत विनंती करून ती सुविधा घ्यावी लागते. मात्र सर्वच ठिकाणी त्यांची विनंती मान्य होत नाही. त्यामुळे महिला पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागतो.

त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांसाठी सक्तीने मोबाईल टॉयलेटचे योग्य व्यवस्थापन करणे व सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन ठीक ठिकाणी असणे गरजेचे आहे, असेही निवेदनात म्हटले (Pimpri) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.