CBSE Fake Account’s on X : सोशल मीडियावर सीबीएसईची 30 बनावट खाती

एमपीसी न्यूज – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) सोशल मीडिया X वर 30 बनावट खाती असल्याचे (CBSE Fake Account’s on X) निदर्शनास आले आहे. त्यावरून प्रसारित होणाऱ्या कोणत्याही माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन सीबीएसईने केले आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सोशल मीडिया हँडल X वर बोर्डाचे नाव तसेच लोगो वापरून ही खाती बनविण्यात आली आहेत. या खात्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

https://twitter.com/cbseindia29/status/1757001896726794737?t=O36XgWLBQCkQN6-x00RL_g&s=19

नावाचा किंवा लोगोचा वापर होत असल्याचे सीबीएसईच्या निदर्शनास आले आहे. ही खाती बनावट असल्याने याबाबत सीबीएसईने माहिती जाहीर केली आहे. cbseindia29 हे खाते सीबीएसईचे अधिकृत खाते असल्याचे सांगण्यात आले आहे. सीबीएसईचे नाव आणि लोगो वापरून बनविण्यात आलेल्या बनावट खात्यांवरून दिली जाणारी माहिती अधिकृत नाही. तसेच त्यासाठी सीबीएसई जबाबदार राहणार नसल्याचे देखील सीबीएससीकडून स्पष्ट करण्यात आले (CBSE Fake Account’s on X) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.