Express Way : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज दोन तास ब्लॉक

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर ( Express Way) आज मंगळवारी (दि. 13) दुपारी दोन तास ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.

द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई वाहिनीवर कि.मी 17.750 येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. मंगळवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत हे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक बंद राहील.

PhD Entrance Exam : ‘सेट’ नंतरच होणार ‘पेट’

वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. पुणे ते मुंबई द्रुतगती मार्गावर हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किमी 55.000 वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 या जुन्या पुणे मुंबई मार्गावरून मार्गस्थ होतील. द्रुतगती मार्गावरून पुणे ते मुंबई वाहिनीवरील हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट किमी 39.800 येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या जुनापुढे मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून ( Express Way) मार्गस्थ होतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.