PhD Entrance Exam : ‘सेट’ नंतरच होणार ‘पेट’

एमपीसी न्यूज – सहाय्यक प्राध्यापक पदासाठी होणारी ‘सेट’ परीक्षा ( PhD Entrance Exam) सात एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पीएचडी अभ्यासक्रमाची प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात ‘पेट’ घेतली जाणार आहे.

 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) दिलेल्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. मात्र या नियमावलीला विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून विरोध होत आहे.

Today’s Horoscope 13 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

पीएचडी रिसर्च सेंटर असणाऱ्या आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकविल्या जाणाऱ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनाच यापुढील काळात विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन करता येणार आहे. यामुळे पीएचडी मार्गदर्शकांची संख्या कमी होणार ( PhD Entrance Exam)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.