Today’s Horoscope 13 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 13 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचा दिवस- मंगळवार

शुभा शुभ विचार- 15 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी ( अंगारक योग)

राहू काळ- दुपारी 3.00  ते  4.30

दिशा शूल – उत्तरेला असेल.

_________________________

मेष – ( शुभ रंग- चंदेरी)

नवीन व्यवसायात कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी. काही जणांना तातडीचे प्रवास घडतील.

वृषभ – (शुभ रंग- सोनेरी)

कार्यक्षेत्रात यशस्वी नेतृत्व कराल. इतरांना न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या तुम्ही पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज थोडा अहंकार वाढेल.

मिथुन – ( शुभ रंग – मरून)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मतांचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. आज कायद्याची चौकट मोडू नका.

कर्क – ( शुभ रंग – हिरवा)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येईल. विरोधक तुमच्या चुका शोधायचा प्रयत्न करतील. अधिकारांचा वापर जपूनच करा उपासनेत खंड नको.

सिंह – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. आज तब्येतही थोडी नरम राहील. पती-पत्नी मधील वादावर मौन हा रामबाण उपाय आहे.

कन्या – ( शुभ रंग – गुलाबी)

नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. पत्नीने दिलेले सल्ले आज योग्य असतील.

तूळ – (  शुभ रंग – लाल)

ध्येयप्राप्ती साठी कामाचे तास वाढवावे लागतील. जुनी दुखणे अंगावर काढू नका काही येणी असतील तर मागायला लाजू नका. गृहिणींसाठी अतिव्यस्त दिवस आहे.

वृश्चिक – ( शुभ रंग- केशरी)

नोकरदार वरिष्ठांच्या मागे पुढे करतील. कलाकारांच्या उमेदवारीस यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. रुग्णांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा दिसून येईल.

धनु – ( शुभ रंग – आकाशी)

घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत. सर्व कामे आज विना व्यत्यय पार पडतील. आनंदी व उत्साही दिवस आहे.

मकर – ( शुभ रंग- मोतिया)

बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष घालाल. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. विद्यार्थी आज अभ्यास सोडून सगळं काही करतील.

कुंभ – (शुभ रंग- राखाडी)

आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. काही पेच प्रसंगांना यशस्वीरीत्या तोंड द्याल. आवक पुरेशी राहील.

मीन-  ( शुभ रंग -निळा)

महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्या मतावर अडून बसाल. अति आत्मविश्वास नुकसानाला कारणीभूत ठरू शकतो. इतरांचेही म्हणणे ऐकून घेण्याची तयारी ठेवा. सुसंवाद हिताचा राहील.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु विषयक सल्लागार.

फोन – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.