Nigdi : राज्यामध्ये बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधामध्ये आपचा आक्रोश मोर्चा

एमपीसी न्यूज : राज्यामध्ये वाढत (Nigdi) चाललेली गुंडगिरी, दडपशाही, झुंडशाही तसेच दिवसा ढवळ्या होणारा गोळीबार याच्या विरोधामध्ये आपच्या शहराध्यक्ष मीना जावळे यांच्या नेतृत्वामध्ये आक्रोश मोर्चा आज आकुर्डी विठ्ठल मंदिर ते अप्पर तहसील कार्यालय पर्यंत निगडी काढण्यात आला. व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ह्यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मीना जावळे, पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, उपाध्यक्ष अशोक लांडगे, उपाध्यक्ष संतोष इंगळे, सचिन पवार, वैजनाथ शिरसाठ हे उपस्थित होते.

यावेळी आपचे राज्य प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत, यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त अकार्यक्षम व असंवेदनशील असे गृहमंत्री म्हणून फडणवीस जी आपल्या महाराष्ट्राला लाभले आहेत. गृहमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी कुत्र्याचा मृत्यू झाला तरी माझा राजीनामा मागतील अशी विपश्चित विधान केले आहे, त्यावरूनच समजते की, गृहमंत्री फडणवीसजी हे किती असंविदेशील आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही घोर निषेध करतो. त्याचप्रमाणे गेल्या महिन्याभरामध्ये मुंबईमध्ये गोळीबारच्या घटना घडल्या.

पुण्यामध्ये निर्भय सभेदरम्यान निखिल वागळे यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला करण्यात आला, ह्यावरून महाराष्ट्र मध्ये कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत हे दिसून येते आहे, परंतु पोलीस प्रशासन व गृहमंत्री फडणवीस साहेब काहीच कारवाई करताना दिसून येत नाही आहे त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशीआम्ही मागणी करतो.

Alandi: सकल मराठा समाज आळंदी देवाची यांच्या वतीने 14 तारखेला आळंदी बाजार पेठ बंद चे आवाहन

त्याचप्रमाणे आप प्रदेश सचिव सागर पाटील, (Nigdi) आप प्रदेश पदवीधर आघाडी अध्यक्ष चेतन बेंद्रे, शहर अध्यक्ष मीना जावळे, प्रवक्ते प्रकाश हागवणे आदी पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनाम्याची मागणी केली.

ह्यावेळी खालील घोषणा देण्यात आल्या:

देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या
ठोकशाही मुर्दाबाद
सामान्य नागरिकांना जगू द्या
हुकूमशाही मुर्दाबाद

यावेळी खालील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सरोज कदम (महिला अध्यक्ष) कमलेश रनवरे, स्मिता पवार, अजय सिंह, सुरेश भिसे, प्रशांत कोळवले, राहुल वाघमारे, ब्रह्मानंद जाधव, गोविंद माळी, अभिजीत सुर्यवंशी, सुरेंद्र कांबळे, कल्याणी चाकणे, स्वप्निल जेवळे, शुभम यादव, राज चाकणे, मिलिंद सरोदे, ॲड.गुणाजी मोरे, अमित मस्के, सय्यद अली, सुदर्शन जगदाळे, अक्षय शिंदे, सतीश यादव, किरण कांबळे, उमेश बागडे, अनिश वर्गीस, बालाजी कंठेकर, विक्रम गायकवाड, मयूर कांबळे, विजय लोखंडे, संजय कोने, शंकर थोरात, प्रशांत कांबळे, ॲड.अमित कांबळे, सुरेखाताई भोसले पुणे महिला अध्यक्ष , नौशाद अंसारी, धनंजय बनकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.