37th SET Exam : 18 ऑक्टोबर ला जाहीर होणार सेटची उत्तरतालिका

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाच्या वतीने दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी 37 वी सेट परीक्षा महाराष्ट्र व गोव्यातील एकूण 15 शहरातील 220 परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती.

या सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका दिनांक 18 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर होणार असून प्राथमिक उत्तरतालिकेबाबत तसेच सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत काही सुचना / तक्रारी असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील http://setexam.unipune.ac.in या लिंकवर असलेल्या ऑनलाईन फॉर्म आवश्यक त्या पुराव्यासह व शुल्कासह सादर करावा असे आवाहन सेट विभागाकडून करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी विद्यापीठ सेट संकेतस्थळावरील सर्व सूचना काटेकोरपणे वाचून नंतरच अर्ज करावेत. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने जमा करावेत व व्यक्तीश: किंवा टपालमार्फत सेट विभागात जमा करण्याची आवश्यकता नाही. उत्तरतालिकेबाबतची लिंक वरील संकेतस्थळावर 18 ते 28 ऑक्टोबर पर्यंत उपलब्ध आहे. 28 ऑक्टोबर 2021 नंतर उत्तरतालिकेबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्राहय धरल्या जाणार नाही, याची सर्व परीक्षार्थीनी नोंद घ्यावी. या प्रकियेनंतर व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेनंतर लवकरात लवकर अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येईल अशी माहिती सेट विभागाचे सदस्य सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.