Pimpri : महापालिका भवनाच्या वाहनतळातील बंद वाहने, नादुरुस्त फर्निचर हटवा

स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील वाहनतळात सर्वत्र बंद वाहने धुळखात पडून आहेत. अनावश्यक फर्निचर अस्ताव्यस्त पडले आहे. त्यामुळे वाहने पार्क करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यासाठी वाहने, फर्निचर तातडीने हटविण्यात यावे अशी मागणी स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीत महापालिका भवन आहे. या भवनाची निर्मिती 1987 मध्ये केली गेली. महापालिका भवनाच्या आवारात नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांसाठी वाहनतळ निर्माण केले आहे. नागरीकरण वाढल्याने, वाहनांची संख्या वाढल्याने महापालिकेत नगरसेवक, नागरिक आणि अधिकारी स्वत:ची वाहने घेऊन येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सध्याचे वाहनतळ अपुरे पडत आहे.

महापालिका आवारात जागोजागी बंद पडलेली वाहने उभी केली आहे. महापालिकेचे अनावश्यक फर्निचर, खुर्च्याही अस्ताव्यस्त पडल्या आहेत. वाहनतळाच्या जागेतच कचरा आणि नादुरुस्त वाहने दिसत आहेत. त्यामुळे महापालिका सभा, स्थायी समिती सभेच्या दिवशी आवारात वाहने लावण्यास जागा उपलब्ध राहत नसल्याने महामार्गावरच वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे वाहनतळ अपूर्ण पडत आहे. त्यासाठी वाहनतळातील बंद वाहने, अनावश्यक फर्निचर तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी मडिगेरी यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.