Vilas Madigeri : प्रभागनिहाय मतदार याद्यांच्या पुराव्यानिशी तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रशासनाने याद्या फोडताना (Vilas Madigeri) नियमानुसार व्यवस्थित काम केले नाही. हेतुपुरस्सार, कोणाच्या तरी सांगण्यावरून, राजकीय दबावाखाली, राजकीय हस्तक्षेप करून प्रभाग क्रमांक 11 मध्ये अपेक्षित असणारी 6000 ते 8000 नावे कमी करून प्रभाग क्रमांक 10 व प्रभाग 3 मध्ये टाकल्याची शंका भाजपचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी व्यक्त केली होती.

या संदर्भात त्यांनी 8000 पैकी काही उदाहरणं म्हणून पुराव्यासह 556 मतदारांचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, भाग क्रमांक, अनुक्रमांक, त्यांचे Epic आयडी, संपूर्ण माहितीसह यादी 22 जून 2022 रोजी प्रारूप प्रसिद्धीच्या एक दिवस अगोदर लेखी तक्रार ईमेलवर आणि प्रत्यक्ष तक्रार पत्र राज्यपाल, राज्य निवडणूक आयोग, भारत निवडणूक आयोग, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, म. न. पा. आयुक्त या सर्वांकडे दिले होते. सदर पुराव्यानिशी तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली. या आक्षेपाबाबत उचित कार्यवाही करण्याचे लेखी आदेश 30 जून रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना दिल्याचे विलास मडिगेरी (Vilas Madigeri) यांनी सांगितले.

23 जून रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. त्यानंतर उदाहरण म्हणून दिलेल्या 556 मतदारांचे नावे तपासली असता 556 नावापैकी त्यातील 363 नावे अन्य प्रभागात म्हणजे प्रभाग 3 मध्ये 9 मतदार, 4 मध्ये 4 मतदार, 9 मध्ये 85 मतदार, 10 मध्ये 265 मतदार टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदार याद्यामध्ये 6000 ते 8000 हून अधिक मतदारांची नावे ही राजकीय दबावापोटी, राजकीय हस्तक्षेप होऊन मतदार याद्यांमध्ये फेरफार करून सध्याच्या अंतिम प्रभाग क्रमांक 11 मध्ये अपेक्षित असलेल्या सेक्टर 3,4,6,7,9,10,11 व 13 तसेच, जय गणेश साम्राज्य, नारायण हठ सोसायटी, प्रिन्सेस विल्ला सोसायटी, पांजारपोळ समोरील गुरुविहार कॉलनी, लांडगेनगर व अन्य अशा या भागातील वास्तव्यास असणाऱ्या हजारो मतदारांची नावे खूप मोठ्या प्रमाणात प्रभाग 3 मध्ये -1974 मतदार, 4 मध्ये – 602 मतदार, 9 मध्ये – 870 मतदार, 10 मध्ये – 3135 मतदार, 12 मध्ये 74 मतदार, 16 मध्ये – 102 मतदार असे एकूण 6755 मतदारांची नावे वरील अन्य प्रभागामध्ये टाकण्यात आली आहेत, असे मडिगेरी यांनी सांगितले.

Shirur Extortion Case: एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस 72 तासात केले जेरबंद

विलास मडिगेरी यांनी 22 जून रोजी 6000 ते 8000 मतदार दुसऱ्या प्रभागात टाकल्याचे लेखी पत्राद्वारे शंका व्यक्त केली. त्यातील 6755 मतदारांची राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या फॉर्ममध्ये हरकत शेवटच्या 3 जुलै रोजी पुराव्यानिशी हरकत त्यांनी घेतली. तसेच प्रत्येक मतदाराचा संपूर्ण नाव पत्त्याचा पुरावा म्हणून प्रत्येकाचा मिळकत कर झेरॉक्स सोबत दिला. झेरॉक्सचे एकूण ७००० पानांक देखील त्यांनी सोबत जोडले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रशासनाने तयार केलेल्या प्रभागरचनेबाबत 25 नोव्हेंबर 2021 रोजी लेखी शंका व तक्रारपत्र दिले होते. त्या प्रमाणेच हेतुपुरस्सार प्रभागाची फोडाफोड करून प्रभागरचना केली होती. त्याची तक्रार व पाठपुरावा करून आणि सुनावाणी प्राधिकृत अधिका-यांकडून न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका 6250/ 2022 द्वारे दाखल केली. त्याची सुनावणी चालू आहे. त्याचा निर्णय सध्या प्रलंबित आहे.

तसेच या संदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे त्यांच्या 25 नोव्हेंबर 2021 व 18 फेब्रुवारी 2022 रोजीच्या मूळ तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असल्याने महानगरपालिका आयुक्त यांना चौकशीचे आदेश देऊन गोपनीय अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर प्रभागरचने प्रमाणेच इंद्रायणीनगर प्रभागाच्या मतदार याद्यांचे विभाजन देखील हेतुपुरस्कर केले गेले आहे. निवडणूक प्रशासनाने याद्या फोडताना नियमानुसार व्यवस्थित काम केले नाही हे यातून स्पष्ट दिसून आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडे हि तक्रार 22 जून रोजी केली होती. या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. या संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त यांना तक्रारीबाबत कार्यवाही करून कळविण्याचे निर्देश दिले आहेत. संपूर्ण प्रभागरचना तयार करताना आणि मतदार याद्या फोडताना निवडणूक यंत्रणेचे चुकीचे कामकाज करण्यात आले आहे. वारंवार चुका निदर्शनास आणून देत प्रशासनाच्या कामकाजात सुधारण झालेली नाही. चुकीच्या कार्यप्रणालीचा पुन्हा बुरखा फाटलेला आहे. निवडणूक यंत्रणेने योग्यरित्या व नियमानुसार निवडणुकीचे कामकाज करावे. अन्यथा महानगरपालिका निवडणूक यंत्रणेचा अनागोंदी कारभार थोपविण्यासाठी आणखी कायदेशीर (Vilas Madigeri) लढा द्यावा लागेल, असेही विलास मडिगेरी यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.