Swami Samartha : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा’ नामघोष करत ग्रंथदिंडीला प्रारंभ

एमपीसी न्यूज : गुरूपौर्णिमे निमित्त 13 जुलै रोजी (Swami Samartha) बुकाव उल्फ कॉलनी चिंचवड येथील मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात आज ग्रंथदिंडीने झाली. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा’ नामघोष करत श्री ग्रंथदीडींला प्रारंभ झाला. तत्पूर्वी श्री गुरुदेव दत्तात्रयाच्या चरणी श्री गुरुलिलामृत ग्रंथ ठेवून त्यांचे पूजन करण्यात आले. तसेच, श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. ग्रंथ आणि श्रींच्या पादुका फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या आणि ग्रंथदिडींला सुरुवात करण्यात आली.

पारंपारीक भारतीय पेहरावात महिला डोक्यावर पूजेचे कलश घेऊन पालखी पुढे आणि त्याहीपुढे श्री समर्थ गर्जना, चिंचवड यांचे ढोल ताशा पथक होते. तसेच, पालखीच्या पाठीमागे देखील महिला आणि पुरुष पारंपरिक पोषाखात श्रींचा नामघोष करत चालले होते. दत्त मंदीर ते श्री स्वामी समर्थ मठापर्यंत ठिकठिकाणी महिलांनी फुगडया घातल्या. भजने गायली, तसेच पुरुषांनी पालखीची धुरा सांभाळली आणि जयघोष केला.

मठाच्या प्रांगणात कलश (Swami Samartha) घेतलेल्या सर्व महिलांचे पाद्यपूजन करण्यात आले. तसेच, पालखी श्री स्वामी समर्थांच्या मठात विराजमान झाली. त्यानंतर ‘श्रीं’ची आरती झाली. तद्नंतर ‘श्री गुरूलिलामृत’ ग्रंथाच्या पारायणास सुरुवात करण्यात आली. तीन दिवस चालणाऱ्या या पारायणास साधारणतः 60 ते 70 महिला आणि पुरुषांनी सहभाग नोंदविला आहे.

Ashadhi Ekadashi : हिंजवडीच्या मंदिरात भजन, कीर्तनाने आषाढी एकादशी साजरी

या सर्व कार्यक्रमाचे संयोजन श्री स्वामी सत्संग मंडळाचे विश्वस्त आणि सर्व समर्थ भक्तांनी केले. तसेच, या सर्व कार्यक्रमाचे पौराहित्य श्री स्वामी समर्थ मठाचे मुख्य पुजारी गुरुजी श्री महेश राजोपाध्ये यांनी केले. आरतीनंतर शाबुदाणा खिचडीचा प्रसाद सर्वांना वाटण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.