Pimpri : पिंपरी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय (Pimpri) लवकर सुरू करण्याची मागणी वकील संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, ॲड. सुनिल कडूस्कर, माजी उपाध्यक्ष ॲड. प्रतिक जगताप, ॲड. पांडुरंग शिनगारे, ॲड. अरुण खरात, ॲड. संगिता कुशलकर, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड. गोरख कुंभार, सचिव ॲड. अक्षय केदार, खजिनदार ॲड. संतोषी काळभोर, सदस्य ॲड. विशाल पौळ, ॲड. तेजस चवरे, ॲड. जयेश वाघचौरे उपस्थित होते.

Tomtom Traffic Index 2023 : वाहतूक कोंडीत पुणे जगात सातव्या क्रमांकावर; पुण्याचा वेग ताशी 19 किलोमीटर

पिंपरी चिंचवड मधील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पिंपरी नेहरूनगर न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात खटले दाखल होत आहेत. त्याचा ताण न्यायव्यवस्थेवर पडत आहे. परिणामी न्यायदानाच्या कामासाठी वेळ लागत आहे. पुणे येथे अपिलातील खटले चालवण्याकरिता बहुसंख्य वकील वर्ग व पक्षकार यांना वाहतूक कोंडी, पार्किंग यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

पिंपरी येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये चार कोर्ट रिकामे आहेत. त्या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय लवकरात लवकर चालू करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले (Pimpri) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.