Tomtom Traffic Index 2023 : वाहतूक कोंडीत पुणे जगात सातव्या क्रमांकावर; पुण्याचा वेग ताशी 19 किलोमीटर

एमपीसी न्यूज – जगातील 55 देशांतील 387 शहरांच्या वाहतूक कोंडीचा अहवाल (Tomtom Traffic Index 2023) नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये पुणे शहर जगात सातव्या तर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडी आणि पर्यायाने प्रदूषणाचा आलेख चढता झाला आहे. पुण्याचा वेग ताशी 19 किलोमीटर एवढा मंदावला आहे.

Talavade : ज्योतिबा नगर मधून मध्यरात्री बुलेट दुचाकी चोरीला

Tomtom Traffic Index 2023 नुकताच प्रकाशित झाला. सन 2023 सालात शहरांची वाहतुकीच्या बाबतीत काय परिस्थिती आहे, याचे सखोल विश्लेषण या अहवालात करण्यात आले आहे. या अहवालात पहिल्या क्रमांकावर लंडन शहर आहे. लंडन शहरात वाहतुकीचा वेग ताशी 14 किलोमीटर आहे. पहिल्या दहा शहरांमध्ये भारतातील दोन शहरे आहेत. जगात सहाव्या क्रमांकावर बेंगलोर तर सातव्या क्रमांकावर पुणे शहर आहे.

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (United States of America) देशातील Oklahoma City हे शहर या यादीत सर्वात शेवटी आहे. या शहरात वाहतुकीचा वेग ताशी 61 किलोमीटर एवढा आहे.

Vadgaon : अध्यापक महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

पुणे जिल्ह्यात असलेल्या औद्योगिक वसाहती, आयटी कंपन्या, शैक्षणिक संस्था यामुळे जगभरातून लाखोंच्या संख्येने नागरिक पुण्यात आले आहेत. याचा शहराच्या वाहतुकीवर ताण येतो. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये सायंकाळी पाच ते आठ या वेळेत सर्वाधित वाहतूक कोंडी होते. या वेळेत ताशी 16 किलोमीटर एवढ्या कमी वेगाने वाहने चालतात.

सन 2023 या वर्षातील पुण्यातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा दिवस म्हणून 9 सप्टेंबर या दिवसाची नोंद झाली आहे. मागील वर्षभरात प्रत्येक पुणेकरांचे 128 तास वाहतूक कोंडीत गेले आहेत. तर गेल्या वर्षभरात झालेल्या एकूण कार्बन डायओक्साईडच्या (CO2) उत्सर्जनापैकी 25 टक्क्यांहून अधिक उत्सर्जन केवळ वाहतूक कोंडीत ( Tomtom Traffic Index 2023 )  झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.