Pimpri : कुल्फी खाताय ….बनविण्याचे ठिकाण स्वच्छ आहे का? 

एमपीसी न्यूज – सध्या  उकाडा इतका वाढला आहे की,शरीराची लाहीलाही  होऊन सतत तहान लागत (Pimpri)आहे. त्यामुळे पुणेकरांची पावले थंडावा देणाऱ्या खाद्यपदार्थांकडे वळू लागली आहेत. त्यामुळे काहीतरी थंड खावे म्हणून अनेक जण थंड कुल्फी व बर्फाचा गोळा खाताना दिसतात. मात्र हे खाद्यपदार्थ निकृष्ट पद्धतीने बनविले असल्याने आरोग्याला हानिकारक ठरत आहेत.

यंदाच्या वर्षी उन्हाचा पारा जास्त आहे. त्यामुळे उन्हात प्रवास करताना‌ सतत तहान लागते त्यामुळे प्रत्येक जण थंड पेय , गार-गार पाणी, कुल्फी, सरबत आदी पदार्थ थंड वाटावे म्हणून  खात पित आहे. त्यामुळे कुल्फी, सरबत हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. थंड खाद्यपदार्थाच्या वाढत्या मागणीमुळे काही विक्रेते निकृष्ट आणि आरोग्याला हानिकारक असणाऱ्या कुल्फी खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणत आहे.

हात गाडीवाले रस्त्यावर पाच किंवा दहा रुपयाला कुल्फी विक्री करण्यासाठी फिरतात. मात्र ही कुल्फी तयार कुठे होते हे आपल्याला माहित नसते.बहुतांशी  पाच किंवा दहा रुपयाला मिळणारी कुल्फी बनविण्याचे ठिकाण व तयार करण्यासाठीचे  भांडे अस्वच्छ असते . यासह खवा देखील निकृष्ट दर्जाचा असतो.

 

कुल्फी बनवण्याआधी तो खवा तसाच जमिनीवर बारदानावर मळून घट्ट केला जातो.भांडी, साचा खराब पाण्यात धुतली जातात. तसेच बर्फ देखील खराब असतो. हा बर्फ खाण्यासाठी योग्य नसतो. हे निकृष्ट दर्जाच्या पदार्थांपासून बनविलेली कुल्फी आरोग्याला हानिकारक असते.म्हणूनच हात गाडीवरची पाच किंवा दहा रुपयाला मिळणारी कुल्फी खाताना विचार करा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.