Pimpri : शेतकऱ्यांवरील लाठीमाराचा स्वराज अभियानकडून निषेध

एमपीसी न्यूज – महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या दिवशी दिल्ली येथे आपल्या मागण्यांसाठी उत्तर प्रदेशमधून आलेल्या हजारो शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने केलेल्या लाठीमारचा स्वराज अभियानने निषेध केला आहे.

सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादनावर दीडपट हमीभाव देऊन शेतकऱ्यांची कर्ज माफी करु अशी आश्‍वासने दिली होती. मात्र सत्तेवर आल्यावर त्यांना आश्‍वासनांचा विसर पडला. भारतीय किसान युनियनने किसान क्रांती यात्रा आयोजित केली होती. या यात्रेत सहभागी झालेल्या लाखो शेतकऱ्यांवर मोदी सरकारने अहिंसा दिनी बळाचा वापर केला.

या निमित्ताने मोदी सरकारचा ढोंगीपणा व खरा चेहरा समोर आला आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असून भांडवलदार धार्जिणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे देशातील जनता संतप्त असून आगामी निवडणुकांत याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असे स्वराज अभियानचे अध्यक्ष मानव कांबळे व सचिव संजीव साने यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.