Pimpri : योग्य व्यक्तीला पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढते – मानव कांबळे

एमपीसी न्यूज – योग्य व्यक्तीला पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढते. गेले ३५ वर्षाहून अधिक काळ पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेल्या तत्त्वनिष्ठ आणि निर्भीड विचाराच्या नंदकुमार सातुर्डेकर यांना ‘हिंद रत्न कामगार पुरस्कार’ दिल्याने या पुरस्काराची उंची वाढली, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी येथे केले.

Pune : पुढील 48 तासात पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीच्या अतिक्रमणावर कारवाई करा : आमदार महेश लांडगे

इंटक संलग्न हिंद कामगार संघटनेच्या वतीने सन २०२३ चा ‘हिंदरत्न कामगार पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांना प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, संत तुकाराम महाराज यांची पगडी, उपरणे व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. खराळवाडी येथील हिंद भवन येथे आयोजित या कार्यक्रमात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती वैष्णवी विनोद जगताप हीचाही सन्मान करण्यात आला.

तसेच दिव्यांगांना तीन चाकी सायकल चे वाटप करण्यात आले. यावेळी हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास कदम, सरचिटणीस यशवंत सुपेकर, उपाध्यक्ष शांताराम कदम, खजिनदार सचिन कदम, सचिव गणेश गोरीवले, प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, कामगार नेते अनिल रोहम, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, प्रसाद शेट्टी, इंटक सचिव मुकेश तिगोटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख आदी उपस्थित होते .

कांबळे म्हणाले की, कार्यकर्त्याचा पिंड असलेल्या सातुर्डेकर यांनी कोणत्याही प्रलोभनांना आमिषाला बळी न पडता या शहरात पत्रकारिता केली. त्यामुळे त्यांचा गौरव अतिशय उचित आहे. पिंपरी महापालिका दिव्यांगांसाठी बऱ्यापैकी काम करत आहे मात्र राज्य शासन उदासीन असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की, गेल्या काही वर्षात पत्रकारिता क्षेत्र झपाट्याने बदलले आहे. याही परिस्थितीत टिकून राहणे पत्रकारांसाठी मोठे आव्हान आहे. जागतिकीकरण, कंत्राटीकरण, कामगार कायद्यातील बदल याचा कामगार चळवळीवरही मोठा परिणाम झाला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.