Pimpri : मोबाइल टॉवर पॅनल गरम झाल्याने बसथांब्याला आग

एमपीसी न्यूज- इमारतीवरील मोबाईल टॉवर पॅनल गरम झाल्याने शॉर्ट सर्किटमुळे कचऱ्याला तसेच बसथांब्याला आग लागली. गुरुवारी (दि.१८) सकाळी साडेअकराच्या सुमारास पिंपरीतील रत्ना हॉटेलजवळील इमारतीमध्ये ही घटना घडली.

अग्निशामक दलाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, रत्ना हॉटेल शेजारील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीवर अनेक मोबाईल टॉवर आहेत. लोड आल्यामुळे मोबाईल टॉवर गरम झाले व प्लायवूडने पेट घेतला. यामुळे वायरने पेट घेतला व ही वायर रस्त्यापलीकडे झाडावरून गेली असल्याने झाडाला आग लागली. त्यानंतर ही आग झाडाखाली असणाऱ्या कचऱ्याला व बसस्थानकाला लागली. अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत काही मिनिटामध्ये आग आटोक्यात आणली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.