Pimpri : बोपखेल -रामनगर परिसरात पूरसदृश परिस्थिती अद्याप कायम

एमपीसी न्यूज – सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बोपखेल-रामनगर येथील नदीकाठच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने बहुतांश लोकांना बोपखेल येथील मनपाच्या शाळेमध्ये व स्थानिक मंदिरे अशा सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

तसेच त्या भागातील जनावरे आणि पूरग्रस्त लोकांच्या मौल्यवान वस्तू बाहेर काढण्यात मदत केली. त्यांना युवासेना पिंपरी विधानसभा तर्फे प्रतिक्षा घुले व महेंद्र भाऊ वाघमारे (अध्यक्ष-दलित पॅंथर) यांच्या वतीने नागरीकांशी संवाद साधून त्यांना आधार देण्यात आला. त्यांच्या जेवनाची व्यवस्था करण्यात भविष्यात त्यांना सर्वौतपरी मदत करण्याचे आश्वासन युवासेना तर्फे देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.