Pimpri : व्हॉट्सॲपवरील मतदानासंदर्भातील ‘तो’ संदेश चुकीचा !

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज- मतदार ओळखपत्र नसले तरी किंवा मतदान यादीत नाव नसले तरी फॉर्म क्र. 7 भरून मतदान करता येते, अशी माहिती सध्या व्हॉटस्ॲप व इतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही माहिती खोटी असून यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

या बाबत स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की, फॉर्म क्र. 7 हा इतर व्यक्तिंचे नाव समाविष्ट करण्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी, स्वतःचे नाव वगळण्यासाठी किंवा इतर कोणत्याही व्यक्तिचे नाव मृत्यू /स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी करावयाचा अर्ज आहे.

या फॉर्मद्वारे मतदान करता येणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारी यासंबंधीच्या पोस्टवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. यादीत नाव असेल आणि मतदार ओळखपत्र नसले तरी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या इतर अकरा ओळखपत्रांच्याद्वारे मतदानाचा हक्क बजावता येतो, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.