Pimpri : डॉ. गोविंद कुलकर्णी यांना ‘ग्लोबल ब्राह्मण लीडर’ पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज- राजस्थान येथील सर्व ब्राह्मण महासभेतर्फे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांना ग्लोबल ब्राह्मण लीडर पुरस्कार ” जाहीर झाला आहे. जागतिक पातळीवर ब्राह्मण समाजाच्या एकत्रीकरण व सक्षमीकरणाकरिता केलेल्या कार्याचा दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अशी माहिती सर्व ब्राह्मण महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पं सुरेश मिश्रा यांनी दिली आहे.

सर्व ब्राह्मण महासभेच्या वतीने आयोजित ‘ब्राह्मण संगम’ कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार राजस्थानचे राज्यपाल कालराज मिश्रा यांच्या हस्ते
पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 1 आणि 2 मार्च रोजी बिर्ला एडिटोरियम जयपूर येथे होणार आहे. या कार्यक्रमा करिता देशभरातील ब्राह्मण संघटनेचे प्रमुख, सामाजिक संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आणि ब्राह्मण चळवळीतील मंडळी उपस्थित राहणार आहेत. डॉ. गोविंद कुलकर्णी यांना या कार्यासाठी यापूर्वी राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.