Pimpri : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महापालिकेकडून अभिवादन

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri) वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील तसेच पिंपरी चौक आणि एच.ए.कॉलनी येथील त्यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासन शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Pimpri : आनंद शिंदे यांच्या भीमगीतांनी दुमदुमला परिसर

यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, मुख्य संयोजक तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, उपआयुक्त रविकिरण घोडके, मनोज लोणकर, माजी नगरसदस्य ॲड.सचिन भोसले, अनंत को-हाळे,मारुती भापकर, सद्गुरू कदम, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे, विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, उप अभियंता ल्क्ष्मीकांत कोल्हे, चंद्रकांत कुंभार, एच.ए.कंपनी येथील रमेश जाधव, सुरेंद्र पासलकर, मारूती बोरावके, मिलींद जाधव, सुनिल रिकामे, विविध सामाजिक संघटनांचे (Pimpri) पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.