Khopoli Bus Accident : कठडा असता तर अपघात टळला असता; डॉ. पठाण यांची प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज : आज पहाटे पिंपरी चिंचवड येथून कार्यक्रम आटपून (Khopoli Bus Accident) निघालेल्या बाजीप्रभू ढोल ताशा पथकाच्या तरुण मुलांचा भीषण अपघात झाला. सुमारे 150 फुट खोल दरीत बस कोसळली आणि 12 तरुणांचा मृत्यू होऊन 28 जण जखमी झाले. कार्यक्रमाच्या थकव्याने तसेच साखरझोपेत असताना या मुलांचा अपघात झाला. यावेळी सर्वप्रथम धाव घेणाऱ्या गावकरी आणि डॉक्टरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. रियाज पठाण यांच्या मते कठडा नसल्याने उतरावर बस सरकल्याने हा अपघात झाल्याचे म्हंटले आहे. 

कठडा असता तर अपघात टळला असता – 

डॉ. रियाज पठाण यांनी या घटनास्थळी प्रतिक्रिया देताना म्हंटले, की तीव्र उताऱ्यामुळे हा अपघात घडला. जर या ठिकाणी कठडा असता तर बस दरीत कोसळली नसती. आणि भीषण अपघातही टळला असता.

Pimpri : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महापालिकेकडून अभिवादन

गावकऱ्यांनी सावधानतेने हाताळली परिस्थिती – 

अपघातग्रस्त तरूणांपासून गावकऱ्यांपर्यंत सर्वच जण साखर झोपेत (Khopoli Bus Accident) असताना हा अपघात घडला. मुलांच्या किंकाळ्या ऐकू आल्याने आजूबाजूच्या परिसरातील गावकरी हादरले आणि आवाजाच्या दिशेने त्यांनी धाव घेतली. सर्वप्रथम त्यांनी मुलांना आणि महिलांना बाहेर काढले. यामध्ये अनेकजण त्यांच्याकडे घसा सुकला आहे आम्हाला पाणी द्या असे म्हणत होते. परंतु, रुग्णांना दावाखान्यात उपचाराआधी लगेच पाणी देऊ नये असा डॉक्टरांचा सल्ला असल्याने त्यांनी मुलांची समजूत काढली.

काहीच मिनिटांत आपण दवाखान्यात पोहचणार आहोत. तिथे गेल्यावर सर्वकाही मिळेल अशी समजूत काढून जखमीना योग्य उपचार दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.