Khopoli Bus Accident : पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात मदत पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाची लगबग

एमपीसी न्यूज – जुना मुंबई-पुणे महामार्गावर शिंगरोबा मंदिराजवळ (Khopoli Bus Accident) खासगी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला. यात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बसमधील सर्व प्रवासी हे झांज पथकातील कलाकार होते. शनिवारी (दि. 15) पहाटे झालेल्या या अपघाताने अवघ्या देशाचे लक्ष वेधले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सर्व नेत्यांकडून या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले जात आहे. तसेच अपघातग्रस्तांना मदत पुरविण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.

अपघातातील मृतांची नावे 
जुई दिपक सावंत (वय 18, रा. गोरेगाव, मुंबई), यश सुभाष यादव, वीर कमलेश मांडवकर (वय 6), वैभवी साबळे (वय 15), स्वप्नील श्रीधर धुमाळ (वय 16), सतिश श्रीधर धुमाळ (वय 25), मनीष राठोड (वय 25), कृतिक लोहित (वय 16), राहुल गोठण (वय 17), हर्षदा परदेशी (वय 19, रा. माहीम,मुंबई), अभय विजय साबळे (वय 20, रा. मालाड, मुंबई), एका व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

अपघातातील जखमींची नावे 

एमजीएम हॉस्पिटल येथे दाखल जखमींची नावे – आशिष विजय गुरव (वय 19, रा. दहिसर मुंबई), यश अनंत सकपाळ (वय 17, रा. गोरेगाव, मुंबई), जयेश तुकाराम नरळकर (वय 24, रा. कांदिवली, मुंबई), वृषभ रवींद्र कोरमे (वय 14, रा. गोरेगाव, मुंबई), रुचिका सुनील डुमणे (वय 17, रा. गोरेगाव, मुंबई), आशिष विजय गुरव (वय 19, रा. दहिसर, मुंबई), ओंकार जितेंद्र पवार (वय 25, रा. खोपोली, रायगड), संकेत चौधरी (वय 40, गोरेगाव, मुंबई), रोशन शेलार (वय 35, रा. मुंबई), विशाल अशोक विश्वकर्मा (वय 23, रा. गोरेगाव, मुंबई), निखिल संजय पारकर (वय 18, रा. मुंबई), युसुफ मुनीर खान (वय 13, रा. मुंबई),  कोमल बाळकृष्ण चिले (वय 15, रा. सांताक्रुज, मुंबई), अभिजीत दत्तात्रेय जोशी (वय 20, रा. गोरेगाव मुंबई), मोहक दिलीप सालप (वय 18, रा. मुंबई), दिपक विश्वकर्मा (वय 20, रा. गोरेगाव, मुंबई), सुरेश बाळाराम अरोमुक्कंम (वय 18, रा. गोरेगाव, मुंबई)

खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल जखमींची नावे – नम्रता रघुनाथ गावनुक (वय 18, रा. गोरेगाव, मुंबई), चंद्रकांत महादेव गुडेकर (वय 29, रा. गोरेगाव, मुंबई), तुषार चंद्रकांत गावडे (वय 22, रा. गोरेगाव, मुंबई), हर्ष अर्जुन फाळके (वय 19, रा. विरार), महेश हिरामण म्हात्रे (वय 20, रा. गोरेगाव, मुंबई), लवकुश रणजीत कुमार प्रजापति (वय 16, रा. गोरेगाव, मुंबई), शुभम सुभाष गुडेकर (वय 22, रा. गोरेगाव, मुंबई), ओम मनीष कदम (वय 18, रा. गोरेगाव, मुंबई), मुसेफ मोईन खान (वय 21, रा. गोरेगाव, मुंबई)

जाकोटिया रुग्णालय खोपोली येथे दाखल जखमीचे नाव – सनी ओमप्रकाश राघव (वय 21, रा. खोपोली,रायगड)

 

पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

महाराष्ट्रात रायगड येथे झालेल्या बस दुर्घटनेने व्यथित झालो आहे. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन(Khopoli Bus Accident) गमावले आहेत, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. अपघातात जखमी झालेले लवकर बरे होतील, अशी मी आशा व्यक्त करतो. अपघातग्रस्तांना राज्य सरकार शक्य ती सर्व मदत करत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.

https://twitter.com/PMOIndia/status/1647145273825849346?t=W06FQPHJDBOqaIhgvCwl5g&s=19

रायगड अपघातातील मयतांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफ (प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड) मधून 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

https://twitter.com/PMOIndia/status/1647145278326345729?t=qj-XWizv3y2W6PsJXDKi5A&s=19

मुख्यमंत्र्यांकडून आढावा

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची पाहणी केली.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1647098798315847681?s=19

अपघात प्रकरणी दुःख व्यक्त करत अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना व्यक्त केल्या. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1647098795400806401?s=19

उद्योगमंत्र्यांनी घेतली रुग्णालयात धाव

घटनेची माहिती मिळताच राज्याचे उदयोग मंत्री उदय सामंत यांनी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून मृतांच्या कुटुंबियांना तसेच जखमींना सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळी (Khopoli Bus Accident) भेट देऊन पाहणी केली.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.