Kivle :  पत्ता विचारणाऱ्या तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज – पत्ता विचारण्यासाठी थांबलेल्या तरुणाला (Kivle) अडवून तिघांनी मिळून लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. 14) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मुकाई चौक, किवळे येथे घडली.

गौतम बिनोद भारद्वाज (वय 19 , रा. कोथरूड, पुणे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Khopoli Bus Accident : पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात मदत पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाची लगबग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरून जात असताना फिर्यादी मुकाई चौकात थांबले. तिथे ते मुंबईला कोणता रस्ता जातो, अशी विचारपूस करीत होते. त्यावेळी तिथे आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीकडील लॅपटॉप आणि मोबाईल फोन (Kivle) असा 30 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.