Chikhali : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तरुणाने लैंगिक (Chikhali ) अत्याचार केला. ही घटना बुधवार (दि. 12) आणि गुरुवारी (दि. 13) तळवडे येथे घडली.

अजित पाटील (वय 25, रा. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या मावशीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 Kivle :  पत्ता विचारणाऱ्या तरुणाला लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिला फूस लावून दुचाकीवरून पळवून नेत यमुनानगर येथील लॉजवर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असल्याचे फिर्यादीत म्हटले (Chikhali ) आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.