Pimpri : घरगड्याने चोरले सव्वासहा लाखांचे सोने

एमपीसी न्यूज – घरगडी म्हणून काम करणा-या एकाने 6 लाख 25 हजार रुपये किमतीची चार सोन्याची बिस्किटे चोरून नेली. ही घटना 23 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत साधू वासवानी गार्डनजवळ पिंपरी येथे घडली.

नारायण रिजूमल सुखेजा (वय 56, रा. शिवसागर, साधू वासवानी गार्डन जवळ पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रवी नाथ (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नेपाळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी नाथ हा फिर्यादी नारायण यांच्या बहीण आशा राजकुमार तोताणी यांच्या घरात काम करतो. आशा या शनिवारी (दि. 23) रात्री नऊच्या सुमारास गावी गेल्या. दरम्यान रवी याने घरात ठेवलेली 6 लाख 25 हजार रुपये किमतीची चार सोन्याची बिस्किटे चोरून नेली. मंगळवारी (दि. 26) सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.