Chikhali : जात कळल्याने लग्नास नकार देणाऱ्या युवकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर तिची जात समजल्याने लग्नास नकार दिला. याबाबत मुलीच्या आईने युवकाविरोधात गुन्हा नोंदवला. ही घटना चिखली आणि लातूर येथे घडली.

अक्षय हनुमंत साकोरे (रा. मोईगाव, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या 32 वर्षीय आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न करण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध जोडले. त्यातूनच तिच्यावर चिखली आणि लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडा अहमदपूर येथे वेळोवेळी अत्याचार केले. आरोपीने अल्पवयीन मुलीला 31 जानेवारी रोजी अहमदपूर लातूर येथे पळवून नेले आणि तिथेही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने मुलीची जात माहिती झाल्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.

याबाबत पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. आरोपीवर अपहरण, बलात्कार, पॉक्सो, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक चपाईतकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.