Moshi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; पती-पत्नीविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष दाखवून एकाने 23 वर्षीय तरूणीवर अत्याचार केला. त्यासाठी त्याच्या पत्नीने त्याला साथ दिली. हा प्रकार मोशी येथे घडला.

धनंजय पोपट लोमटे (वय 42) व त्याची पत्नी मनीषा लोमटे (वय 35) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धनंजय आणि मनीषा हे पती-पत्नी आहेत. धनंजय याने पीडित तरुणीशी मैत्रीचे संबंध जोडले. पीडितेला धनंजय याने सांगितले की, ‘मी माझ्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार आहे. त्यानंतर आपण लग्न करू.’ असे आमिष दाखूवन आरोपीने 21 फेब्रुवारी 2018 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत पीडितेवर अत्याचार केले. यावेळी धनंजयची पत्नी हिनेही त्याला प्रोत्साहन दिले. मात्र् त्यांनी घटस्फोट न घेता पीडितेची फसवणूक केली. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीवर फसवणूक व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तोडकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.