HB_TOPHP_A_

Pimpri : निगडी परिसरात अवैध धंदे राजरोसपणे सुरु

पोलीस प्रशासन कारवाईशून्य; जन क्रांती सोशल फाउंडेशनचा आरोप

0 599

एमपीसी न्यूज – निगडी आणि देहूरोड परिसरात अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. यामुळे परिसरात गुन्हेगारी आणि सामाजिक अशांतता पसरत आहे. याबाबत जन क्रांती सोशल फाउंडेशनच्या वतीने आज (गुरुवारी) पिंपरी येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

HB_POST_INPOST_R_A

जन क्रांती सोशल फाउंडेशन आणि यंग स्टार स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने पोलिसांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, दत्तनगर, निगडी स्मशानभूमीजवळ, तळवडे, पत्राशेड यांसारख्या परिसरात राजरोसपणे मटका, जुगार यांसारखे अवैध धंदे सुरु आहेत. यामुळे तरुण पिढी अशा धंद्यांकडे आकर्षित होत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारीला यामुळे खतपाणी मिळत आहे. यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अवैध धंदे चालकांकडून याबाबत आवाज उठवणा-यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे हे घंटानाद आंदोलन करण्यात आले असल्याचे फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष राजू मौला शेख म्हणाले. यावेळी नवनाथ शेलार, जैकप मॅथूज, रमेश गायकवाड, इम्तियाज खान, रामभाऊ उदागे, नवनाथ मस्के, यंग स्टार स्पोर्ट असोसिएशनचे राजेश धनगर, बाळू सावंत, चरण कांबळे, रमेश कांबळे आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: