Pimpri: स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवड 19 व्या स्थानी

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या विकास कामांच्या आधारावर पिंपरी – चिंचवडला 19 वे स्थान प्राप्त झाले आहे. निविदेपासून तर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीपर्यंतचा आढावा घेत गुणांकनाद्वारे स्थान निश्चिती करण्यात आली आहे. शेजारील पुणे 11 व्या स्थानी आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काढण्यात आलेल्या निविदा, मार्किंग, प्रकल्पांतर्गत रस्ते आणि गृहनिर्माण आदींसाठी गुणांकन दिले जातात. याच्याच आधारावर यादी तयार केली जाते. केंद्रीय नगर विकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या यादीमध्ये नागपूर 367.42 अंक मिळवित पहिल्या स्थानावर आहे. तर, दुस-या क्रमांक मिळवणा-या अहमदाबादला 367.36 अंक मिळाले आहे. 344.99 अंकासह सुरत तिस-या क्रमांकावर, 333.9 अंकासह भोपाळ चौथ्या क्रमांकावर तर 311.65 अंकासह रांची पाचव्या क्रमांकावर आहे.

त्रिपुरा सहावा, विशाखापट्टणम सातव्या, वडोदरा आठव्या, वेल्लोर नवव्या, अमरावती दहाव्या, पुणे अकराव्या तर कानपूर बाराव्या नंबरवर आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात पुढे असलेले इंदौर शहर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत 15 व्या क्रमांकावर आहे. पिंपरी – चिंचवड 19 व्या आणि नाशिक 23 व्या क्रमांकावर आहे. पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या देखरेखीखाली शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.