Maval/ Shirur: मावळ, शिरुर मतदारसंघातील लढतीचे चित्र उद्या होणार स्पष्ट 

अर्ज माघारीसाठी उद्या अंतिम मुदत 

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातून दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पुर्ण झाली आहे. त्यानुसार मावळात 28 तर शिरुरमध्ये 26 उमेदवार रिंगणात आहेत. उद्या (शुक्रवारी)अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर या दोन्ही मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

मावळ लोकसभा मतदारसंघातून 32 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी(बुधवारी)झालेल्या छाननीमध्ये चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज त्रुटी असल्याने बाद झाले. तर, शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये 27 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी एका उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाला आहे. मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी उद्या (शुक्रवारी)दुपारी तीनपर्यंत मुदत आहे.

मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीकडून पार्थ पवार तर शिवसेना-भाजप महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे हे प्रमुख उमेदवार आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातून  राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीकडून डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना-भाजप महायुतीकडून खासदार शिवाजीराव आढळराव प्रमुख उमेदवार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.